पांच देवों की आरती मराठी भाषा

 अघसंकटभयनाशन सुखदा विघ्नेशा । आद्या सुरवरवंद्या नरवारण वेशा ।।

पाशांकुशधर सुंदर पुरवीसी आशा । निजवर देऊनि हरिसी भ्रांतीच्या पाशा ।। ।। १ ।।

जय देव जय देव जय सुखकर मूर्ती । गणपति हरी शिवभास्कर अंबा सुखमूर्ती ।। धृ ॥

पयसागरजाकांता धरणीधरशयना । करुणालय वारिसि भववारिजदलनयना ।।

गरुडध्वज भजन प्रिय पीतप्रभवसना । अनुदिनं तव कीर्तनरस चाखो हे रसना ॥ जय ॥ २॥

जय देव जय देव जय सुखकर मूर्ती । गणपति हरी शिवभास्कर अंबा सुखमूर्ती ।। धृ ॥

नंदीवहना गहना पार्वतिच्या रमणा । मन्मथदहना शंभो वातातमजनयना ।।

सर्वोपाय विवर्जित तापत्रयशमना । कैलासाचलवासा करिसी सुरनमना ॥ जय ।। ३ ।।

जय देव जय देव जय सुखकर मूर्ती । गणपति हरी शिवभास्कर अंबा सुखमूर्ती ।। धृ ॥

पद्मबोधकरणा नेत्रभ्रमहरणा । गोधन बंधनहरता द्योतक आचरणा ।।

किरण स्पर्शे वारिसि या तम आवरणा । शरणागत भयनाशन सुखवर्धनकरणा ॥ जय ।। ४ ।।

जय देव जय देव जय सुखकर मूर्ती । गणपति हरी शिवभास्कर अंबा सुखमूर्ती ।। धृ ॥

त्रिभुवनउत्पति पालन करिसीइ तूं माया । नाहीं तुझिया रूपा दुसरी उपमा या ।।

तुझा गुणगणमहिमा न कळे निगमा या । करुणा करिसी अंबे मनविश्रामा ॥ जय ॥ ५॥

जय देव जय देव जय सुखकर मूर्ती । गणपति हरी शिवभास्कर अंबा सुखमूर्ती ।। धृ ॥

टिप्पणियाँ